हातकणंगले / महान कार्य वृत्त सेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिर पठणकडोली ता.हातकणंगले येथे महायुतीचे उमेदवार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी येणार आहेत असे सांगण्यात आले.
शिरोली विभागातुन डॉ.अशोक माने यांना माजी आमदार महादेवराव महाडिक, वारणा कॉम्लेक्स विभागातुन आमदार विनय कोरे, हुपरी विभागातुन आमदार प्रकाश आवाडे रूकडी विभागातुन खासदार धैर्यशिल माने या नेत्यांनी दलितमित्र अशोकराव माने यांना अधिक मताधिक्य मिळाव यासाठी जोर लावायला सुरवात केली आहे. यातच आता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्याकरीता पटणकडोलीला यायचा निर्धार केल्यान जनसुराज्य शक्ती पक्षात चैत्यन्याच वातावरण निर्माण झाल आहे.