Spread the love


बीड,30 जानेवारी
भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सद्वारे माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ”माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा treatment घ्यावी लागेल .. माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे . प्रवास करण्याची परवानगी नाही..” दुखापतीची माहिती देताच त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्‌‍स आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी यापुढे काळजी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, कालपासून पंकजा मुंडे चर्चेत आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने महाराष्ट्रातील सहा जागांवर राज्यसभेवर सदस्य पाठवण्यात येणार आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री व्ही. मुरलीधरन आणि वंदना चव्हाण या खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या जागी संबंधित पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे. तर, भाजपाकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा आहे.