Spread the love

कोल्हापूर,28 जानेवारी
शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे. याकरीता तालुका क्रीडा संकुलासाठी असणारी पाच कोटी रुपयांच्या निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, यड्राव येथील रस्त्ो कामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्त्ो झाला, यावेळी त्ो बोलत होत्ो. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर,
यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उद्योजक एस. व्ही. कुलकर्णी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत्ो.
मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, देशभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला लागणारी बहुतांश यंत्रसामग्री पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत्ो, ही गौरवास्पद बाब आहे. या औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक त्ो सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे नमूद करुन श्री. बनसोडे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्ृात्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाची दृष्टी असणारे नेत्ृात्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. आमदार यड्रावकर हे अभ्यासू नेत्ो असून या भागाच्या विकासासाठी त्यांना आवश्यक त्ो सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक तथा उद्योजक अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला क्रिकेटचा आनंद
जयसिंगपूर येथे नगरपरिषदेच्या माध्यमात्ूान उभारण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू स्टेडियमला क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील खेळाडूंसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. खेळाडूंनी टाकलेल्या गोलंदाजीवर त्यांनी उत्तम फलंदाजी तर केलीच शिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षणही केले. क्रीडा क्षेत्रात उत्तम करिअर आहे. शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी जिद्द, परिश्रम व सरावात सातत्य ठेवून सचिन त्ोंडुलकर, रोहित शर्मा यांच्याप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे, अशा सदिच्छा त्यांनी या खेळाडूंना दिल्या.
जयसिंगपूर विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्त्ो जयसिंगपूर येथील विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी श्री बनसोडे यांच्या हस्त्ो कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर, राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, यंत्रअभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अभियंता मनोज लिंग्रस व आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे आदी मान्यवर उपस्थित होत्ो.