Spread the love

आंदोलन अंकुश कडून मिशन 3500 ची घोषणा 

2016/17 ला कंपोस्ट खताचा 400 रुपये असलेला दर कारखान्याने दरवर्षी 50 रुपये प्रमाणे वाढवत वाढवत या वर्षी 700 रुपये पर्यंत नेला. पण उसाचा 3115 रुपये असलेला दर कमी कमी करत तो 2950 केला. कारखाना आपल्या मालाचा दर वाढवतो आहे पण आपल्या उसाचा दर कमी देत आहेत. याचा शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार करून मिशन 3500 ला साथ द्यावी असे अवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.

केंद्र सरकार ने पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण घेतल्यापासून देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निकालात निघाला आहे व देशांतर्गत बाजारात साखरेला जादा दर गेल्या दोन वर्षांपासून मिळू लागला आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी ऊस हंगाम 2021/22 मध्ये साखर 3100 ते 3200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकली होती तर गत आर्थिक वर्षात ती वाढून 3400 ते 3500 रुपये प्रति क्विंटल ( करविरहित ) विकली आहे. साखर विक्रीच्या वाढलेल्या दरातून क्विंटलला 300 ते 400 रुपये जादा पैसे कारखान्यांना मिळालेले आहेत ते पैसे कारखान्याकडे आजरोजी शिल्लक आहेत ते शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून तात्काळ द्यावेत अशी मागणी प्रत्येक कारखान्याकडे मिशन 3500 अंतर्गत करणार असल्याचे आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिरोळ येथील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी तक्त्त येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की शिरोळ च्या दत्त साखर कारखान्याला कोजनरेशन प्रकल्पातून अंदाजे 40 कोटी रुपये नफा दरवर्षी विज विक्रीतून मिळत आहे तसेच यावर्षी मळीमधे 15 किलो जादा साखर सोडून ( B हेवी मोल्यासीस पासून ) इथेनॉल तयार केले आहे त्यातून कारखान्याला जो अतिरिक्त नफा झाला आहे त्यातील प्रतिटन 100 रुपये शेतकऱ्यांना देता येतात.

खते औषधे मशागत मजुरी याचे दर वाढलेमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे व गेल्या हंगामात उसाचे उत्पादन प्रति एकर 20 टनाने कमी झाल्याने शेतकरी संपूर्ण तोट्यात गेला आहे व त्याचे पीककर्ज सुद्धा गेल्या वर्षी फिटलेले नाही ऊस उत्पादक शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे त्याला यातून वाचवायचे असेल तर त्याला परवडणारा दर कारखान्यांना द्यावा लागणार आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे तर त्याउलट साखर कारखाने साखरेचा वाढलेला दर व उप पदार्थाना मिळत असलेले वाढीव दर यामुळे प्रचंड नफ्यात आलेले आहेत.

साखरेला दर नाही म्हणून शेतकऱ्यांना एफ आर पी घेऊन गप्प बसावे लागत होते पण आता इथेनॉल उत्पादनामुळे साखरेला चांगला दर मिळू लागला आहे आणि कारखान्याकडे साखर विक्रीतून आलेले पैसे शिल्लक आहेत त्यामुळे च यावर्षी एफ आर पी च्या वर पैसे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजेत. म्हणून आमची दत्त कारखान्याकडे मागणी आहे की वाढलेल्या साखर दराचे 300 रुपये, विज विक्रीतील 100 रुपये व इथेनॉल च्या नफ्यातील 100 रुपये असे 500 रुपये दुसरा हप्ता म्हणून तात्काळ द्यावेत अशी मागणी दत्त कारखान्यासह दोन जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.  यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दत्तात्रय जगदाळे, दीपक पाटील, प्रवीण माने ,संभाजी शिंदे ,दीपक माने ,अक्षय पाटील ,आनंद भातमारे ,अमोल गावडे सर ,प्रकाश बावडेकर, शशिकांत काळे ,पोपट राणे, महादेव काळे, रघुनाथ पाटील, रशीद मुल्ला ,संभाजी माने ,गणपती दबडे ,नितीश कोळी ,उद्धव मगदूम, संपत मोडले, किरण सेवेकरी आदी उपस्थित होते

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील इतर कारखान्यांनाही देणार निवेदन

https://youtu.be/dYVP2jMhQgM
दत्त कारखान्याकडे मागणी आहे की वाढलेल्या साखर दराचे 300 रुपये, विज विक्रीतील 100 रुपये व इथेनॉल च्या नफ्यातील 100 रुपये असे 500 रुपये दुसरा हप्ता म्हणून तात्काळ द्यावे

तर उसाला टनाला 4000 रुपये भाव मिळाला असता 

जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेला मागणी व चांगला दर मिळत असताना केंद्राने साखर निर्यातबंदी केली आणि भारतातील साखर दर नियंत्रित केले जर साखर निर्यात झाली असती तर कारखान्यांना प्रतिक्विंटलला अजून 1000 रुपये जादा मिळाले असते व ते पैसे शेतकऱ्यांना मिळून उसाचा दर 4000 च्या घरात मिळाला असता. 

  • 2017 – 18 केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले होते.
  • मग आता साखरेची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असताना निर्यात बंदी का ?

महत्वाचे 

दत्त कारखान्याने ऊस हंगाम 2016/17 मध्ये 3290 रुपये ने साखर विकली होती त्यावेळी 3115 रुपये दर दिला होता गत हंगामात 3500 रुपये ने साखर विकली आहे म्हणजे 3300 रुपये दर नुसत्या वाढलेल्या साखर दरातून कारखान्याला सहज देता येतो.