Spread the love

शिरोळ : प्रतिनिधी

मतभेद कितीही जुने असले, तरी संवाद, सामंजस्य आणि एकत्र येण्याची प्रामाणिक भावना असेल तर मनामनांतील अंतर नक्कीच मिटू शकते, याचा प्रत्यय शिरोळमध्ये आला. धनगर समाजातील दोन गटांमध्ये गेल्या तब्बल १६ वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर सामंजस्याने मिटला असून, दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक एकीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.या पार्श्वभूमीवर श्री दत्त कारखाना कार्यस्थळी दोन्ही गटांतील समाजबांधवांचा सन्मान करून त्यांच्या एकीच्या निर्णयाचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, शिरोळ तालुका धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी देवाप्पा पुजारी, बाळू पुजारी, चंद्रकांत पुजारी, शामराव पुजारी, गुंडा पुजारी, प्रकाश पुजारी, शशिकांत रघुनाथ पुजारी, कामान्ना गावडे, बबन पुजारी, बजरंग वंटे, काशिनाथ हराळे, शशिकांत पुजारी, अशोक पुजारी, ओंकार वंटे, अमोल पुजारी, नवनाथ पुजारी, अर्जुन कणके, पवन गुपचे, आप्पासो पुजारी, अनिल पुजारी, कृष्णा पुजारी, काशिनाथ गुपचे, शुभम पुजारी, सागर पुजारी, माणिक पुजारी, काशिनाथ पुजारी, सौरभ वंटे, सुयश पुजारी आणि दादासो पुजारी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

१६ वर्षांचा दुरावा संपवून समाजबांधवांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद – गणपतराव पाटील

१६ वर्षांचा दुरावा संपवून समाजबांधवांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील मतभेद बाजूला ठेवून संघटितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान अमृता पुजारी यांच्यासारखे गुणवंत खेळाडू घडविण्याचे काम यापुढेही सातत्याने सुरू राहिले पाहिजे. त्याचबरोबर नवीन खेळाडू, उद्योजक तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे विद्यार्थी तयार करण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत. केवळ एकीचा निर्णय घेऊन थांबू नका, तर त्यातून पुढील पिढीचे उज्ज्वल भविष्य घडवा, असा संदेश त्यांनी दिला.वादापेक्षा संवाद मोठा आणि संघर्षापेक्षा माणुसकी श्रेष्ठ, हे शिरोळमधील या घटनेने अधोरेखित केले आहे. १६ वर्षांची कटुता मागे टाकून निर्माण झालेली ही एकजूट समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आर्थिक प्रगतीला नवी दिशा देणारी ठरेल,
दत्त उद्योग समूहाची प्रमुख श्री गणपतराव पाटील