दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दिवसभरात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात आल्या.
नदीवेस नाका येथील अध्यात्मिक केंद्रात सकाळी ८ वाजता भुपाळी आरतीने उत्सवाला प्रांरभ झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीवर शोडषोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्रीस्वामी याग संपन्न झाला. 10.30 वाजता नैवेद्य आरतीनंतर भाविक सेवेकऱ्यांनी मांदीयाळीचा (सामुदायीक सहभोजन) आंनद घेतला. दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तीक सेवा करण्यात आली. सांयकाळी 6.30 वाजण्याच्या आरतीने उत्सवाची सांगता झाली. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिडोंरी प्रणित) नदी वेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामुल्य मार्गदर्शन अखंडीत चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.
शहरातील पंचगंगा नदीस पात्रास जलपर्णीने वेढले असल्याने ती नदी नसून, मैदान भासत आहे. पंचगंगा नदीस जलपर्णीमुक्त करण्याची जबाबदारी पंचगंगा जलतरण मंडळ, महादेव मंदिर घाट येथील सदस्यांनी घेतली. जलपर्णीमुक्त पंचगंगा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे ,शनिवार (ता. १८)पासून सुरू केलेल्या या उपक्रमात नदीपात्रातील बरीचशी जलपर्णी काढण्यात आली. हा उपक्रम नदीचे पात्र जलपर्णीमुक्त होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. उपक्रमात अमित वडिंगे, मोहन खोंद्रे, जयसिंग भाले, सुरेश फातले, सतीश पदमई, रामा तेलसिंगे, सुहास काळे, संभाजी शिंदे, विनायक जोशी, बाबू अपराध, दीपक दत्तवाडे, ॲड. सतीश दरिबे, नामदेव सूर्यवंशी, जितू पोवार, उमेश मजले, विनायक आरेकर आदी सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त चंदुर मध्ये महा रक्तदान शिबिर
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व राष्ट्रीय बजरंग दल शाखा शाहूनगर चंदुर च्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त दिनांक १९व २० मार्च २०२३ रोजी महा रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ४०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून उदंड प्रतिसाद दिला व छत्रपती संभाजी राजांना वेगळीच आदरांजली दिली .यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी संयोजकांनी सर्व रक्तदात्यांना शिवाजी सावंत लिखित ‘ छावा’ ही कादंबरी भेट देण्यात आली
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय बजरंग दलाचे संतोष हत्तीकर यांच्या व दत्ता पाटील किशोर मोदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड ,सचिन जनवाडे ,पंढरीनाथ ठाणेकर , इत्यादी मान्यवर उपस्थित राहून शिबिरास व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
सलग दोन दिवस झालेल्या या रक्तदान शिबिरासाठी सांगली सिव्हील ची लोकल गव्हर्मेंट ब्लड बँक, राष्ट्रीय बजरंग दलाचे गोरक्षक जिल्हाध्यक्ष अनिकेत तानगुडे, तेजस राणे, सुरज लाड ,गणेश नाकील ,संतोष नाकील, रंणजित शिंदे आदित्य धामणे, आदर्श तानुगडे, सुशांत राणे, दीपक अष्टेकर आशिष कागले सुरज अत्तिगडत अनिकेत लाटकर धुळा पुजारी किरण सावंत नितीन गावडे व राष्ट्रीय बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.