कर्नाटक

Spread the love

बेळगाव येथे युवा क्रांती महा मेळावाव्यात कांग्रेस पक्षकडून ऐतिहासिक घोषणा……

बेळगाव येते आज युवा क्रांती महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आली होती, या कार्यक्रम ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कांग्रेस गॅरंटी नंबर 04 युवा निधी चा अनावरण करण्यात आले..या युवा क्रांती महा मेळाळाव्यात कांग्रेस पक्षा कडून युवा निधी म्हणून बेरोजगार पदवीधर मुला मुलींच्या साठी प्रति महिना 3000 हजार दोन वर्ष व डिप्लोमा पदवीधर मुला मुलीच्यासाठी दर महिना 1500 रु भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली…
या वेळी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, आजी माजी खासदार आमदार, काँग्रेस पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते..

यावेळी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, गोकाक, निपाणी, चिकोडी, रायबाग, बैलहोंगल, धारवाड, हुक्केरी, अथणी, सौंदत्ती, संकेश्वर, यमकनमर्डी, याचा सहा खेडॉपाडी गावा तिल काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक लाखो संख्येने उपस्थित होते..

बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस रस्ता कामासाठी 6 कोटी 50 लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला असून येत्या काळामध्ये स्वच्छ व सुंदर रस्ते निपाणीमध्ये तयार होणार असून संपूर्ण निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन धर्मदाय खात्याच्या मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी केले…
त्या निपाणी येथे निपाणी नगरपालिका तर्फे सन 2022 23 साठी नगरोत्थानातील चौथ्या टप्प्यातील निधी मधून रस्ता बांधकाम उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या…

कार्यक्रमाच्या सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथे मान्यवराचे हस्ते भूमी पूजन संपन्न झाली, त्या नंतर नगर पालिका समोर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले. तर स्वागत भाषण आयुक्त जगदीश हूलगेज्जी केले.
पुढे बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या. निपाणीच्या जनतेने मला पहिला महिला आमदार होण्याचा मान दिलेला आहे. यासाठी या मतदारसंघातील सर्वांगीण विकास करण्याचा मानस असून अनेक समाजांना समुदाय भवन. विविध गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार. शाळा. पिऊसी कॉलेज डिग्री कॉलेज व आयटीआय कॉलेज साठी भरघोस निधी उपलब्ध करून विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले…..

खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले.. निपाणी तालुक्यातील सर्व ठिकाणी रस्ते, पानंद रस्ते जलजीवन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, यासह निपाणी तालुक्यातील मंदिर मस्जिद. यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन एक विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले..
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. खानापूर माजी आमदार अरविंद पाटील,हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले.अभय मानवी. आधी ने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक नगरसेविका, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…..

बातमीदरचे नाव : गौतम जाधव
गावाचे नाव : निपाणी
दिनांक : 20/03/23

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *