Spread the love

प्रा.चंद्रकांत मोरे यांचे नाव निश्चित



शिरोळ/प्रतिनिधी
शनिवारी प्रा.चंद्रकांत मोरे, रा.शिरढोण,ता.शिरोळ, जि.कोल्हापुर यांच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने पक्क झाल्याच सांगण्यात आल. रविवार पासुन प्रा.चंद्रकांत मोरे 18 दिवसाच्या खासगी भेटीसाठी शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. प्रमुखांच्या गाठीभेटी आणि संवाद साधणार आहेत. धनुष्यबाण या चिन्हावर ते निवडणूक लढवतील असे सांगण्यात आल.
प्रा.चंद्रकांत मोरे व खासदार धैर्यशिल माने यांच्यात सकाळी 8.25 ते 9.12 पर्यंत रूईकर कॉलनी कोल्हापुर येथे बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी डॉ.सागर पाटील, संजय शिंदे, आप्पालाल चिक्कोडे उपस्थित होते. यानंतर ते बंद खोलीतुन बाहेर आले. प्रा.मोरे यांना पुप्पगुच्छ देवून सत्कार केला.
प्रा. मोरे यांच्याशी संवाद साधला मी खुपवर्षे एकनिष्ठ होतो, शिवाय गेली 48 वर्षे शिरोळ तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात व अन्य क्षेत्राततुन लोकसंर्पकात आहे. पक्षाचा आजचा आदेश आणि माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवेण शिरोळ तालुक्याची जनता मला विधानसभेत पाठवेल रविवार पासुन मी संर्पक दौरा सुरू करतोय. पक्षाच्या वरिष्ठांनी लोकप्रतिनिधींनी जो सन्मान केला. त्याच सोन मी करेण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासाचे निर्णय घेतलेत असेही ते म्हणाले.
खा.धैर्यशिल माने म्हणाले, प्रा.चंद्रकांत मोरे सर यांनी सक्रिय राहून वेगवेगळ्या राजकीय संघर्षात आणि संकटातही स्वर्गिय खासदार बाळासाहेब माने यांच्या 5 लोकसभा निवडणूका, श्रीमती निवेदिता माने यांच्या 4 लोकसभा निवडणूका, माझी ग्राम पंचायत, दोन जिल्हा परिषद व दोन लोकसभा निवडणूका या प्रचार ते आघाडीवरच राहिले. आज काल एकनिष्ठता काय असते हे प्रा.मोरे यांच्या निष्ठेतुन त्यागातुन,परिश्रमातुन दिसुन येते त्यांच नाव पक्षापर्यंत पोहचल, ते आता संर्पक सुरू करतील. इचलकरंजी, हातकणंगले या मतदार संघातही आमचे उमेदवार असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निणर्य घेतील अस त्यांनी म्हंटल.