Spread the love

कोल्हापूर, दि. 4 :

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघात दिनांक 1 ते 3 मे 2024 या कालवधीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग 2 हजार 904 मतदारांपैकी 2 हजार 751 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग 1 हजार 27 मतदारांपैकी 959 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.

   47 कोल्हापूर लोकसभात मतदार संघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ 2 हजार 395 मतदारांपैकी 2 हजार 276 ज्येष्ठ नारिकांनी मतदानाचा हक्क बजाविला तर 509 दिव्यांग मतदारांपैकी 475 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. 

  यामध्ये 271 चंदगड विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 541 व 122 दिव्यांग, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 336 व 82 दिव्यांग, 273 कागल विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 382 व 105 दिव्यांग, 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 381 व 71 दिव्यांग, 275 करवीर विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 303 व 59 दिव्यांग तर 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 333 व 36 दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

  48 हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 864 मतदारांपैकी 800 ज्येष्ठ नारिकांनी मतदानाचा हक्क बजाविला तर 163 दिव्यांग मतदारांपैकी 159 दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. 

  यामध्ये 277 शाहूवाडी विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 126 व 37 दिव्यांग, 278 हातकणंगले विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 133 व 15 दिव्यांग, 279 इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 130 व 12 दिव्यांग, 280 शिरोळ विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 107 व 24 दिव्यांग, 283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 93 व 23 दिव्यांग व 284 शिरोळ विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील 211 व 48 दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.